إعدادات العرض
मी म्हणालो: हे रसूल अल्लाह ﷺ! सर्वांत जास्त सन्मान कोणाचा करावा?…
मी म्हणालो: हे रसूल अल्लाह ﷺ! सर्वांत जास्त सन्मान कोणाचा करावा? त्यांनी उत्तर दिले: "तुझी आई, नंतर तुझी आई, नंतर तुझी आई, नंतर तुझा वडील, नंतर जवळच्या नात्यातील व्यक्ती, जवळच्या नात्यातील व्यक्ती
बहज़ बिन हकीम यांचे वडील आणि त्यांचे आजोबा यांच्याकडून आलेले आहे की, त्यांनी सांगितले: मी म्हणालो: हे रसूल अल्लाह ﷺ! सर्वांत जास्त सन्मान कोणाचा करावा? त्यांनी उत्तर दिले: "तुझी आई, नंतर तुझी आई, नंतर तुझी आई, नंतर तुझा वडील, नंतर जवळच्या नात्यातील व्यक्ती, जवळच्या नात्यातील व्यक्ती."
[حسن] [رواه أبو داود والترمذي وأحمد]
الترجمة
العربية Bosanski English فارسی Français Bahasa Indonesia Русский Türkçe اردو हिन्दी 中文 Kurdî Português Tiếng Việt অসমীয়া Nederlands Kiswahili Hausa ગુજરાતી සිංහල Magyar ქართული Română ไทย తెలుగు دری አማርኛ বাংলা Malagasy Македонски Українська Tagalog ភាសាខ្មែរ ਪੰਜਾਬੀ پښتوالشرح
नबी ﷺ यांनी स्पष्ट केले की सर्वात जास्त आदर, सद्गुणी वर्तन, चांगले व्यवहार, सौम्य संबंध आणि सहवास याचा अधिकारी व्यक्ती ही आई आहे. त्यांनी आईच्या हक्काचे महत्त्व तीन वेळा सांगितले, जेणेकरून तिची इतर सर्व लोकांपेक्षा अद्वितीय प्रतिष्ठा स्पष्ट होईल. यानंतर नबी ﷺ यांनी स्पष्ट केले की आईनंतर सर्वात जास्त आदर करण्याचा हक्क वडील आहे, त्यानंतर नातेवाईकांमध्ये जो सर्वात जवळचा असेल, आणि जितका जवळ असेल, तितकेच त्याच्याशी संबंध ठेवणे आणि सद्गुणी वर्तन करणे आवश्यक आहे.فوائد الحديث
हदीस मध्ये आईला प्रथम, नंतर वडील, त्यानंतर जवळच्या नात्यातील व्यक्तींना त्यांची जवळीकानुसार क्रमाने प्राधान्य दिले आहे.
वडीलधाऱ्यांची आणि विशेषतः आईची स्थान/महत्व स्पष्ट करणे.
हदीस मध्ये आईसाठी आदर तीनदा पुन्हा सांगितला आहे; कारण तिचे मुलांवर असलेले विशेष महत्त्व, जन्माच्या वेदना, प्रसूतीची कष्ट, दुधपानाची काळजी — जी फक्त आईला अनुभवावी लागते — आणि त्यानंतर ती वडिलासह संगोपनात भाग घेते.