जमीन-जुमला (मालमत्ता) मिळविण्याचा ध्यास घेऊ नका, नाहीतर तुम्ही दुनियेकडे (या जगाच्या सुखांकडे) झुकाल

जमीन-जुमला (मालमत्ता) मिळविण्याचा ध्यास घेऊ नका, नाहीतर तुम्ही दुनियेकडे (या जगाच्या सुखांकडे) झुकाल

अब्दुल्लाह बिन मसऊद (रज़ी अल्लाहु अन्हु) म्हणतात की, रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म‌‌‌ यांनी म्हटले — "जमीन-जुमला (मालमत्ता) मिळविण्याचा ध्यास घेऊ नका, नाहीतर तुम्ही दुनियेकडे (या जगाच्या सुखांकडे) झुकाल."

[حسن لغيره] [رواه الترمذي وأحمد]

الشرح

नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म‌‌‌ यांनी बाग, शेती किंवा जमीन-जुमला मिळविण्यापासून मनाई केली आहे, कारण हे सर्व गोष्टी माणसाला दुनियेच्या प्रेमात आणि तिच्या मोहात पाडतात, आणि त्यामुळे तो अखेरतपासून (परलोकापासून) बेफिकीर होतो.

فوائد الحديث

जगाच्या संपत्तीची प्रचंड आवड टाळावी, विशेषतः अशा गोष्टींपासून ज्या माणसाला परलोकापासून विचलित करतात.

हदीसमध्ये अशी एखादी गोष्ट घेण्यास मनाई नाही ज्यातून एखादी व्यक्ती जगू शकते, परंतु या जगात स्वतःला विसर्जित करण्यास आणि नंतरचे जीवन विसरण्यास मनाई आहे.

अल-सिंधी म्हणाले: याचा अर्थ काय आहे:जगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नका आणि अशा प्रकारे अल्लाहच्या स्मरणापासून आपले लक्ष विचलित करू नका.

التصنيفات

Virtues and Manners, Condemning Love of the World